अहिल्यानगर : जिल्ह्यातील कारखान्यांनी थकवली ऊस बिले, शिवसेना शेतकरी सेनेचा आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा खर्च भागवणे, कर्जफेड करणे आणि पुढील हंगामाची तयारी करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीयनि लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा. संबंधित कारखानदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे नेते अभिजित पोटे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत अभिजित पोटे यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या प्रलंबित ऊस बिलांचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुकडी कारखान्याचे मागील हंगामातील थकीत बिल पूर्णपणे दिलेले नाही. या वर्षाच्या हंगामातील बिलही रखडलेले आहे. शेतकऱ्यांचे उसाचे बिल रखडविणाऱ्या कारखान्यांना ही रक्कम लवकरात-लवकर देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखान्यांनी थकीत बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. थकीत ऊस बिल तत्काळ द्यावे; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी सेनेने दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here