पुणे : ऊस शेतीत वाढतोय एआय ड्रोनचा वापर; उत्पादनात ३५-४० टक्के वाढीची शेतकऱ्यांची अपेक्षा

पुणे : संत तुकाराम साखर कारखान्याच्यावतीने मरकळ येथे कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारीत ऊस लागवड क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे, माजी संचालक राजाराम लोखंडे, बाळासाहेब लोखंडे, नवनाथ लोखंडे, शंकर लोखंडे तसेच खेड गटातील शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याने ऊस उत्पादन वाढीसाठी बारामती कृषी विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुध्दिमतेचा (एआय) वापर करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत २३० एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येत आहे.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सोमाटणे, कासारसाई, पवनानगर व मरकळ गटातील मौजे दारूंब्रे, सांगवडे, शिरगाव, धामणे, गोडुंब्रे, साळुंबे, पाचाणे, उर्से, कासारसाई, नेरे, कडधे, बाम्हणोली, येळसे महागाव, काले, मरकळ या गावांतील ऊस क्षेत्रावर ड्रोनव्दारे फवारणी करण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात २ स्वयंचलित हवामान केंद्र व २१ शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली. तर कार्यकारी संचालक एस. जी. पठारे म्हणाले की, या योजनेंतर्गत उपग्रह आधारित मॅपिंग करून मृदा, आद्रता, सेंन्सर बसविण्यात आले आहेत. ॲपद्वारे हवामान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड पूर्व सूचना याबाबतच्या शिफारशी शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना सकारात्मक फायदा होत आहे. यामुळे किमान ३५ ते ४० टक्के ऊस उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here