सातारा : अजिंक्यतारा कारखान्यात आगामी गळीत हंगामाची तयारी, ऊस तोडणी, वाहतूक करार सुरू

सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. आगामी गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आवश्यक ती ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करारबद्ध करण्यात यावी, हंगामात जास्तीत जास्त यंत्रणा हजर राहिली पाहिजे. ऊस पुरवठादार शेतकरी सभासद यांचा नोंद झालेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याकडे गाळपास यावा याकडे संबंधित यंत्रणेने काटोकोरपणे लक्ष द्यावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाइस चेअरमन नामदेव सावंत यांनी केले. कारखान्याच्या आगामी गळीत हंगाम २०२६- २७ साठी ऊस तोडणी वाहतुकीच्या कराराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्हाईस चेअरमनसावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच हा कार्यक्रम झाला.

यावेळी कार्यकारी संचालक मोहिते यांनी ऊस तोडणी मजुरांचा वाढता प्रश्न विचारात घेवून या हंगामा करिता जादा ऊस तोडणी मशिन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. माजी चेअरमन सर्जेराव सावंत, माजी चेअरमन रामभाऊ जगदाळे, संचालक विश्वास शेडगे, डॉ. शशिकांत साळुंखे, अजिंक्यतारा ऊस तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन चंद्रकांत घोरपडे, संचालक, मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, लालसिंग शिंदे, सेक्रेटरी बशीर संदे, वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक पैगंबर शेख, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊस तोडणी कंत्राटदार व वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here