सातारा : निर्यातबंदीमुळे साखर पाच महिने गोदामातच अडकणार, कारखानदारांचे कंबरडे मोडणार!

सातारा : राज्यात २०० हून अधिक खासगी आणि सहकारी साखर कारखाने असून, या कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात एकूण ९ कोटी ८३ लाख १८ हजार ८३४ क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन झाले आहे तर सातारा जिल्ह्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून १ कोटी ८ लाख ६० हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आता केंद्र सरकारने जवळपास पाच महिने निर्यातीला बंद घातली आहे. यामुळे कारखान्यांच्या गुदामात पडून राहणार आहे. देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत रहावा व अन्नसुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर ३० सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. मात्र, यातून साखर कारखानदारीचे कंबरडे मोडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे आधीच अडचणीत असलेल्या कारखान्यांची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. केंद्राने ३० सप्टेंबर २०२६ नंतरदेखील बंदी कायम ठेवली तर कारखान्यांना कारखान्यांसमोरील अडचण वाढणार आहे. त्यामुळे साखर निर्यातीचे धोरण ठरवताना शेतकरी आणि कारखान्यांवरील परिणामांचा विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाने दि. ३० एप्रिल रोजी मे महिन्यासाठी ५८६ साखर कारखान्यांना २२.५ लाख मेट्रिक टन साखरेचा मासिक कोटा वितरित केला. यात महाराष्ट्राला ६.६६ लाख मेट्रिक टन कोटा आहे. निर्यातीसाठी कोटा कमी झाल्यास देशांतर्गतच कारखान्यांशी स्पर्धा होणार आहे. गेल्या वर्षांपासून सरकारने साखरेची एमएसपी वाढवलेली नाही. सरकारच्या धोरणामुळे साखरेचे दर पडले अन् शेतकऱ्यांची बिले थकली की कारखानदार हात वर करणार अशी स्थिती आहे. त्यामुळे यातून साखर उद्योगाचेच नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here