सातारा : कृष्णा कारखान्यासाठी दुसऱ्या दिवशी आणखी दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल

सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले. आजअखेर चार अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज दिवसभरात ६० अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी कार कालपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शुक्रवारअखेर (ता. २२) अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे उमेदवार निवडीपासून त्याचा अर्ज दाखल करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलकडे काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आघाड्यांची लगबग सुरू आहे. २६ मे ते नऊ जून अर्ज माघारीची मुदत आहे. २१ जूनला मतदान, तर २३ जूनला मतमोजणी आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी रेठरे बुद्रुक शेणोली या गटातून संतोष जाधव व बापूसाहेब साळुंखे यांचे दोन अर्ज दाखल झाले. दोन दिवसांत सुमारे ८२ अर्जाची विक्री झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here