सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १३८ कोटी ४५ लाख रुपये थकविले

सोलापूर : राज्यात सरलेल्या साखर हंगामात २१० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. मात्र गळीत हंगाम संपुनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप ९३४ कोटी रुपये मिळालेले नाहीत. राज्यातल्या ८३ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकली आहे. सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेता असे दिसते की, जिल्ह्यातील कारखान्यांनी १३८ कोटी ४५ लाख रुपये थकविले आहेत. जिल्ह्यात ३६ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला होता. त्यापैकी २५ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. १० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम दिली नाही.

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी एफआरपी थकविणाऱ्या ७४ साखर कारखान्यांची सुनावणी घेतली असून, शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यातील काही कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ऊस नियंत्रण कायद्यानुसार प्रत्येक साखर कारखान्याला गाळपाला आलेल्या उसाचे १४ दिवसात पैसे देण्याचे कारखानदार नियमानुसार व एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे. राज्यातील ठरावीक साखर एफआरपीपेक्षा अधिक पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतात. मात्र, काही साखर कारखाने दरवर्षीच उसाचे पैसे पुढील हंगाम येईपर्यंत देत नाहीत

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here