बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांसाठी ऊस परिसंवाद

बेळगाव : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्यावतीने हदनाळ उत्पादक परिसरातील ऊस शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद घेण्यात आला. संचालक आनंदा यादव यांनी स्वागत केले. यावेळी प्रकाश शिंदे म्हणाले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील कारखाना विविध उपक्रम राबवित आहे. हदनाळमध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र होत आहे.

ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील म्हणाले, सभासदांनी एकरी उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. बेणे, रोपे निवडताना स्वतःचे बियाणे प्लॉट निर्माण करावेत. योग्यवेळी खतांची मात्रा आवश्यक आहे. ठराविक अंतराने सरी सोडल्यास फुटव्यांची संख्या चांगली राहते. श्रीकांत कणंगले, आनंदा पाटील, दशरथ पाटील, यांनी ऊस विकास योजनेचे कौतुक केले. यावेळी किरण निकाडे, तुकाराम शेटके, केरबा पाटील, दिलीप शेटके, सूरज पाटील, सागर पाटील, निवास मगदूम, अमोल काळे, बाळासाहेब शेटके, डॉ. सुभाष पाटील, सचिन पाटील, सौरभ कोकणे, शुभम पाटील आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here