सोलापूर : जकराया शुगरकडील उर्वरीत ५० टक्के ऊस बिले व्याजासह देण्याची जनहित संघटनेची मागणी

सोलापूर : वटवटे येथील जकराया शुगर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ ची थकीत ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. कारखान्याने उसासाठी प्रतिटन १,५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. मात्र, एफआरपी आणि नियमानुसार उर्वरित प्रतिटन ३ हजार रुपये व त्यावरील १५ टक्के व्याजासह रक्कम देणे कारखान्याला बंधनकारक आहे. ही ५० टक्के रक्कम १५ टक्के व्याजासह तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयासमोर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

या धरणे आंदोलनात बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार, अभिमान गायकवाड, संभाजी माळी, सिद्राम वाघमोडे, नागेश बारबोले, शुभम तळेकर, पृथ्वीराज भोसले, उमेश माने, अनिल वसेकर आदी शेतकरी सहभागी झाले आहेत. याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याकडे कारखाना प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा आणि जकराया कारखान्याला शेतकऱ्यांची थकीत रक्कम व्याजासह देण्यास भाग पाडावे. जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर आगामी काळात प्रशासनाविरोधात याहूनही तीव्र आंदोलन केले जाईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here