सांगली : दालमिया भारत शुगर युनिटमध्ये रोलर पूजन, पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

सांगली : आरळा करूंगली येथील दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड, शुगर युनिट निनाईदेवी कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ चा रोलर पूजनचा कार्यक्रम युनिट हेड संजीव देसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी संजीव देसाई म्हणाले की, आगामी गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे ऊस तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असून ऊस तोडणी वाहतुकीसाठी ॲडव्हान्स वाटप दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे.

देसाई यांनी कारखान्यामार्फत ऊस विकास योजना राबवल्या जातात. या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला केन हेड संग्राम पाटील, इंजिनियरिंग हेड किरण पाटील, एचआर हेड महेशकुमार कवचाळे, अकाउंट हेड दिनेश शर्मा, नरेश देशमुख कामगार युनियनचे अध्यक्ष निवृत्ती नायकवाडी आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here