सातारा : एआय तंत्रज्ञानातून शंभर टन ऊस उत्पादन शक्य – माजी मंत्री बाळासाहेब पाटील

सातारा : ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान, ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन व त्याहीपेक्षा जास्त उत्पादन घेणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. सह्याद्रि सहकारी साखर कारखाना यशवंतनगर आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, कारखाना कार्यक्षेत्रातील वाठार (की.) ता. कोरेगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी शंभर टन व त्याहीपेक्षा जास्त उत्पादन घेणे सहज शक्य आहे, त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागामार्फत करण्यात येत आहे, त्याचा लाभ घ्यावा. मागील गळीत हंगामामध्ये प्रतिदिन ७५०० मे टनावरून प्रतिदिन ११००० मे टनाची विस्तारवाढ यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे अग्रोनोमी हेड अरुण देशमुख विभागीय व्यवस्थापक राजकुमार माळी यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि खतांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here