सांगली : ऊस दरासाठी सरकारविरोधात आंदोलन उभारण्याचे रघुनाथदादा पाटील यांचे आवाहन

सांगली : शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी आंदोलन उभे करून देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा पैसे मिळवून देण्यास भाग पाडले; मात्र सरकार पुन्हा झोनबंदी करून शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण करीत आहे. दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर वाढवून ऊसदरातील स्पर्धा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संघटित होऊन आंदोलन उभे केले पाहिजे. असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले. मौजे डिग्रज येथील ग्रामस्थ आणि गावातील विविध संस्थांच्यावतीने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल संयोगिता कोळी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सेवा सोसायटी, भगवान नागरी पतसंस्था, यशवंत लिफ्ट इरिगेशन, कामधेनू पतसंस्था, कामधेनू दूध संस्था, ट्रॅक्टर मालक संघटना, ग्रामविकास वाचनालय आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना रघुनाथ पाटील म्हणाले, की, शेतकरी संघटनेने सन २००२ मध्ये जसे ऊस दरासाठी आंदोलन उभे केले होते, त्याचप्रमाणे आता पुन्हा संघर्ष उभारण्याची गरज आहे. पुन्हा एकदा संघटीत झाले पाहिजे. यावेळी कार्यक्रमात शिकलगार यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील फराटे, पंचायत समितीच्या सदस्या संयोगिता कोळी, सरपंच अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, विनायक जगताप, चंद्रकांत पाटील, शिकलगार गुरुजी, शाम येडेकर आदी उपस्थित होते. प्रकाश कोळी यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here