कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याचे नवे पाऊल, शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची शिवारफेरी

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने करनूर (ता. कागल) येथे शनिवारी, दि. ३० रोजी ऊस शेतीमधील एआय तंत्रज्ञानावर चर्चासत्र आणि शिवारफेरी होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना ऊस उत्पादनवाढ, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात डॉ. तुषार जाधव ‘ऊस पिकात एआय तंत्रज्ञानाचा वापर व महत्त्व’, अरुण देशमुख ‘ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापन’, तर विनय पोळ ‘एआय तंत्रज्ञानामध्ये जिवाणू खतांचे महत्त्व’ या विषयांवर माहिती देणार आहेत.

याबाबत कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता प्रत्यक्ष ऊस शेतीमध्ये वापरलेल्या एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी शिवारफेरीने कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत चर्चासत्र होईल. चर्चासत्रात ऊस पिकातील आधुनिक प्लॉट विकास, एआय तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी युवराज पाटील, भैया माने आणि नविद मुश्रीफ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्राला इच्छुक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here