कोल्हापूर : वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया भारत शुगर ॲण्ड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याने वर्ष २०२५-२६ साठीचे दोन पुरस्कार पटकावले. कारखान्याचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, परिणाम केंद्रीत काम यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार यांना ‘एक्सलन्ट युनिट हेड’ हा पुरस्कार देण्यात आला. कारखान्याच्या शेती विभागास ‘एक्सलन्स इन शुगरकेन ॲग्रीकल्चर’ हा पुरस्कार मिळाला.
युनिट हेड कुंभार यांनी ‘विस्मा’च्यावतीने मिळालेला पुरस्कार सर्व कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आहे असे सांगितले. पुणे येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, आमदार दिलीप वळसे-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते हे पुरस्कार कुंभार, केन हेड श्रीधर गोसावी व शिवप्रसाद देसाई यांनी स्वीकारले. याप्रसंगी सुहास गुडाळे, शिवप्रसाद पडवळ, चिंतामणी पाटील, कनकसबाई, संभाजी भोसले, किशोर लेंगरे उपस्थित होते.


















