अहिल्यानगर : थोरात कारखान्याच्यावतीने विविध गटांमध्ये ऊस विकास मेळावा, उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याने ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. आपणच आपल्या परिसरात पुरेसा आणि दर्जेदार ऊस निर्माण केला, तर बाहेरून ऊस आणण्याची गरजच भासणार नाही. कारखान्याला आवश्यक असलेला संपूर्ण ऊस आपल्या शेतकऱ्यांकडून मिळाला, तर महाराष्ट्रात सर्वाधिक आणि स्पर्धात्मक ऊसदर देणाऱ्या कारखान्यांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम होईल असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर काखान्याच्यावतीने संगमनेर तालुक्यातील विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऊस विकास मेळाव्यांमध्ये ते बोलत होते.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत. ते सक्षम व टिकाऊ ठेवायचे असतील, तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीतून अधिकाधिक ऊस उत्पादन घेतले पाहिजे असे आवाहन केले. ते म्हणाले की, ऊस उत्पादनवाढ हीच कारखान्याच्या प्रगतीची आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची गुरुकिल्ली आहे. सर्वांना सुखी करण्याची खरी ताकद साखर कारखान्यात असते. साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारखान्याशी संबंधित हजारो कामगारांना रोजगार मिळतो. व्यापार, उद्योग आणि बाजारपेठ यांनाही चालना मिळते. ही संपूर्ण अर्थव्यवस्था शेतकरी आणि सहकार क्षेत्रावर अवलंबून असते. ती आपल्यामुळेच चालते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. यासाठीपारदर्शक प्रशासन, अचूक निर्णयप्रक्रिया आणि शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय हे महत्त्वाचे घटक आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here