सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस विकास परिषदेचे आयोजन

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरत येथे झालेल्या पाणी परिषदेतून निळवंडे धरण झाले. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र तरीही धरण आणि दोन्ही कालवे आपण पूर्ण केले. आता पाणी आले आहे. उर्वरित भागालाही पाणी द्यायचे आहे. काँक्रिटीकरण करून पाणी पुढे नेले जात आहे. संगमनेर तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक जगताप, डॉ. समाधान सुरवसे, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

म्हाळादेवी धरण झाले असते तर पाण्याची पातळी वर आली नसती आणि नदीच्या कडेलाच पाण्याचा फायदा झाला असता. मात्र, चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि निळवंडे धरणासाठी आपण पाठपुरावा सुरू केला. ज्यांनी अडचणी निर्माण केल्या, ते आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कालव्याला अस्तरीकरण केले जात असून पाणी पुढे नेले जात आहे, ते ही शेतकरी आमचेच आहेत. पाणी, वीज या राजकारणाच्या पलीकडील गोष्टी आहेत. याबाबत नवीन लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यांचे लक्ष दुसरीकडेच आहे, अशीही टीका माजी मंत्री थोरात यांनी केली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here