सातारा : सह्याद्री कारखान्याने केलेली साखर दरवाढ रद्द करण्याची सभासदांची मागणी

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखरेच्या दरात केलेली वाढ व साखर वाटपातील कपात रद्द करावी, तसेच सभासदांच्या वारस नोंदी व इतर हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी सभासदांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी केली. कारखान्याच्या निवडणूक जाहीरनाम्यात सभासदांना दिलेल्या मोफत व घरपोच साखर वाटपाचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सभासदांच्या न्याय मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गान आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन सह्याद्री कारखान्याचे कार्यकारी संचालकांना दिले. यावेळी भरत विठ्ठल चव्हाण, वसंत पाटील, आनंदराव थोरात, संग्राम पवार, शंकर थोरात, प्रवीण वेताळ, विजय पवार, राजेंद्र जाधव यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here