महाराष्ट्र : राज्यातील सात कारखान्यांकडे २३,२७९ कोटींची एफआरपी थकीत, आरआरसी कारवाई सुरू

मुंबई : राज्यातील गळीत हंगामात यंदा २१० कारखान्यांनी १०४५.६३ लाख उसाचे गाळप केले. या कारखान्यांकडे एकूण ४०,४४६ कोटी रुपयांची एफआरपी देय होती. त्यापैकी ३९७६९ कोटी रुपयांची एफआरपी देण्यात आली आहे, तर ६७७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. तर राज्यातील सात कारखान्यांना साखर आयुक्तालयाने अवसायानाची (आरआसरी) नोटीस बजावली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे २३,२७९.५४ लाख रुपये थकीत आहेत. यामध्ये सोलापूर, धाराशीव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक तीन कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

आरआरसी कारवाई होणाऱ्या कारखान्यांपैकी धोत्री येथील गोकुळ शुगरकडे १३०४६.२५ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. टाकळी-सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे ३०२२.२६ लाख रुपये, श्री संत कुर्मदास साखर कारखान्याकडे १५९७.५६ लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील भिमाशंकर शुगर मिल्स लि.कडे १२२६.५१ लाख रुपये, अहिल्यानगर येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे २२४४.६५ लाख रुपये, नाशिकमधील एस. जे. शुगर डिस्टलरी अॅण्ड पॉवर प्रा. लि., यांच्याकडे १९३.०४ लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगरमधील सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., पैठण या कारखान्याकडे १९४९.२७ लाख रुपये, थकीत आहेत. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज हे अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याचाही आरआरसी कारवाईमध्ये समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here