अहिल्यानगर : ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीत मोठी चुरस, २१ जागांसाठी तब्बल २४० अर्ज दाखल

नेवासे : तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर या दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विरोधकांनी सुद्धा या कारखान्यांची निवडणूक बिनविरोध होऊ न देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळेच सोनईच्या मुळा कारखान्याच्या २१ जागेसाठी अखेरच्या दिवशी ९४ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक चुरस भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आहे. येथे २१ जागांसाठी तब्बल २४० उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी या कारखाना निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीसाठी माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले-पाटील तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह सत्ताधारी कारखाना गटाने अर्ज दाखल केलेले आहेत. विरोधी गटाकडून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि त्यांच्या पत्नी रत्नमालाताई यांच्यासह समर्थकांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. समर्थकांनीही ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. माजी आमदार घुले पाटील, माजी आमदार अभंग यांच्या समर्थकांनीही यंत्रणा कामाला लावली आहे. दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आणि शिवसेनेचे नेते प्रभाकरराव (काका) शिंदे यांच्यासह मात्तबर नेते कार्यरत आहेत. विरोधकांकडून ऐनवेळी आपले पत्ते खुले करण्याचा डाव आहे. त्यामुळे अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here