पुणे : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक, पाच मुकादमांवर गुन्हा, दोघांना अटक

आळेफाटा : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने शेतकरी व कंत्राटदारांची १ कोटी २२ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच मुकादमांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी दोघांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानदेव तेजराव वाघ (रा. गेवराई खुर्द, जि. छत्रपती संभाजीनगर), जगन्नाथ रेवननाथ जायभाये (रा. दुनगाव, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बेल्हे (ता. जुन्नर) येथील शेतकरी विजय बाळासाहेब घोडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी सांगितले की, संशयित ज्ञानदेव वाघ व जगन्नाथ जायभाये यांनी विजय घोडके यांना ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांच्याकडून २६ लाख रुपये आगाऊ रक्कम घेतले. मात्र मजूर न पाठवता ते पसार झाले. संशयितांनी सतीश हांडे, भास्कर हांडे, सुरेश औटी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर उघड झाले. आळेफाटा पोलिसांनी काकासाहेब बाबूराव आगळे (रा. गेवराई खुर्द), सुधाकर मुरलीधर वाघ (रा. गेवराई खुर्द), राजू लोभा चव्हाण (रा. परदरी तांडा) या तिघांविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पन्हाळकर तपास करत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here