धाराशिव : थकीत एफआरपीप्रश्नी भीमाशंकर कारखान्यावर आरआरसी कारवाई, ऊस बिल वाटप सुरू असल्याचा कारखान्याचा दावा

धाराशिव : साखर आयुक्तालयाने थकीत एफआरपीप्रकरणी राज्यातील सात साखर कारखान्यांना अवसायानाची (आरआरसी) नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्याचा समावेश आहे. अहवालानुसार पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड या कारखान्याकडे शेतकऱ्यांचे तब्बल सुमारे १२ कोटी २६ लाख ५१ हजार रुपये थकीत आहेत. दरम्यान, भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक नितीन लोढा यांनी भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेडकडून एफआरपीचे वितरण नियमितपणे सुरू असून त्याबाबतची माहिती साखर आयुक्तालयाला कळविण्यात येणार आहे असे स्पष्ट केले.

साखर आयुक्तालयाने एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. चालू महिनाअखेरपर्यंत शेतकऱ्यांची देणी न चुकवल्यामुळे कारवाई सुरू केली आहे. साखर आयुक्तांनी भीमाशंकर कारखान्याला आरआरसी नोटीस बजावून दणका दिला आहे. आता साखर आयुक्तालयाच्या या नोटीशीनंतर कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांची थकीत देणी कधी आणि कशी चुकवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आरआरसी कायद्यानुसार, थकीत रक्कम ही जमीन महसुलाची थकबाकी समजली जाते. ही नोटीस बजावल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित कारखान्याची साखर, मालमत्ता किंवा जमीन जप्त करून, तिचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करण्याचे कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. त्यामुळे यातून कारखाना कसा मार्ग काढतो याविषयी उत्सुकता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here