पुणे : लाखेवाडी परिसरात पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे ऊस जमीनदोस्त

वडापुरी : इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला. विजेच्या कडकडाटासह मध्यरात्रीनंतर अचानकपणे पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतातील ऊस, कडवळ, मकवान आदी चारा पिके जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतामध्ये काढणी चालू असलेल्या कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. लाखेवाडी परिसरात वादळी वाऱ्याने ऊस पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मंगळवारी मध्यरात्री सुमारे दीड तास मुसळधार पाऊस पडला. यावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमधील उसाचे पीक जमीनदोस्त झाले, अशी माहिती शेतकरी के. के. अनपट व शेटफळ हवेली येथील विजयसिंह कानगुडे यांनी दिली. दरम्यान, पावसामुळे संतोष जगताप यांचाही ऊस आडवा झाला. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here