कोल्हापूर : खतांच्या दरवाढीची शेतकऱ्यांना झळ, युरियाच्या टंचाईमुळे उसाची वाढ खुंटण्याची भीती

माजगाव : ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्याच्या जोमदार वाढीसाठी नायट्रोजन (नत्र) हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. उसाला लागवडीनंतर ३० ते ९० दिवसांच्या कालावधीत युरियाची मात्रा देणे आवश्यक असते. मात्र, खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी युरियासोबत महागडी लिंक खते खरेदीची सक्ती होत आहे. खतांच्या वाढत्या किमतींसह शेतकऱ्यांना लिंकिंगचा सामना करावा लागत आहे. आखाती युद्धामुळे बाजारपेठेत युरिया कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. तसेच पिकांच्या वाढीसाठी युरियाबरोबर इतर मिश्रखतेही वापरणे गरजेचे आहे. मात्र, मिश्र खतांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना युरियाच्या प्रत्येक पोत्यासोबत सक्तीने दाणेदार व इतर खते खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे.

रासायनिक खतांच्या वापराने उसाचे कांडे मजबूत होतात, गाठी वाढतात आणि पर्यायाने साखर उताऱ्यासह एकरी उत्पादनात मोठी वाढ होते. मात्र सध्या खतांचे दर भरमसाठ प्रमाणात वाढले आहेत. रासायनिक खतांपैकी २०:२०:०:१३ हे खत १४५० रुपयांवरून १८०० रुपयांवर गेले आहे. तर शेतकऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या १०:२६:२६ या मिश्र खतासाठी १९५० वरून २२५० रुपये मोजावे लागत आहेत. २४:२४:०० या खतासाठी २००० ऐवजी २२०० रुपये द्यावे लागत आहेत. तर १९:१९:१९ हे मिश्रखत २०७५ वरून २३०० रुपयांपर्यंत गेले आहे. पोटॅशचा दर १८५० वरून १९७५ रुपयांवर गेला आहे. ऐन गरजेच्या वेळी बाजारात खतांची दरवाढ आणि युरिया गायब झाल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

माजगाव येथील शेतकरी विजय पाटील यांनी बहुतांश कृषी सेवा केंद्रांत युरियाचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मात्र, जिथे साठा शिल्लक आहे तिथे युरियासोबत जबरदस्तीने महागडी ‘लिंक खते’ खरेदीची सक्ती केली जात असल्याचा आरोप केला. खतांचे वितरण सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here