सातारा : अजिंक्यतारा कारखान्यातर्फे पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

काशीळ : शाहूनगर-शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँक व महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत प्रक्षेत्र भेट व शेतकरी चर्चासत्र झाले. अजिंक्यतारा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वनगळ, आरळे, गोजेगाव, नागठाणे, अतीत, वर्णे आणि निगडी वंदन या गावांत प्रक्षेत्र भेटी व चर्चासत्रे झाली. यावेळी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तथा पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापन प्रकल्पाचे समन्वयक धर्मेंद्रकुमार फाळके यांनी पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापनाच्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले.

समन्वयक फाळके यांनी पूर्वहंगामी ऊस लागवड, हिरवळीची खते आणि ताग पिकाच्या वापराचे फायदे याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी प्रमाणित ऊस नर्सरीतून रोपांची खरेदी करावी. तरच ऊस लागवड चांगली होवून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. खोडवा पिकात पाचट शेतात ठेवणे आवश्यक असून, त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीची पूर्व मशागत करताना सबसॉयलरचा वापर केल्यास फायदे होत होतात. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, ऊस विकास विभागातील कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here