अहिल्यानगर : वृद्धेश्वर कारखाना निवडणुकीत तीन अर्ज अपात्र, ३९ अर्ज वैध, माघारीकडे लक्ष

पाथर्डी : तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी कारखाना निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये ४४ अर्जांपैकी तिघांचे अर्ज अपात्र ठरले. तर दोन अर्ज कमी करण्यात आले. विविध कारणांमुळे भाऊसाहेब उघडे, मल्हारी टकले, शामराव गरड या तिघांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. आता ३९ अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. त्यानंतर अर्ज माघारीच्या मुदतीत किती जणांकडून माघार घेतली जाते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. निवडणुकीच्या रिंगणात विविध उत्पादक गटांतून २६, सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था प्रतिनिधी प्रवर्गातून तीन, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात दोन, महिला प्रतिनिधी प्रवर्गात तीन, इतर मागास वर्गात तीन आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून दोन अर्ज दाखल आहेत.

गुरुवारी छाननीच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन नेत्यांचे अतिरिक्त अर्ज कमी करण्यात आले. विद्यमान चेअरमन आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिका राजळे यांनी एकाच जागेवर दोन-दोन अर्ज दाखल केले होते. छाननीवेळी प्रत्येकी एक-एक अर्ज कायम ठेवून, अतिरिक्त दोन अर्ज कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ३९ अर्ज उरले आहेत. यामध्ये उत्पादक व्यक्ती सभासद मतदारसंघांत बापुसाहेब पाटेकर, उद्धवराव वाघ, मोनिका राजळे, राहुल राजळे, आप्पासाहेब राजळे, शिवशंकर राजळे, नारायण बर्डे, सुभाष ताठे, साहेबराव सातपुते, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, संभाजी गर्जे, रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, उद्धव ससे, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, सुरेश आठरे, राजेंद्र गवळी, प्रदीप पाटील, सिंधु बडे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, रामकिसन शिरसाट यांचा समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here