सांगली : महाकाली कारखाना वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे जयसिंगराव शेंडगे, संदीप आबांचे आवाहन

कवठेमहांकाळ : महाकाली साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि सुरू असलेला भ्रष्टाचार मी सभासद व कामगारांसमोर मांडला होता. मात्र त्यावेळी सभासद आणि कामगारांनी मला पाठिंबा न देता सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवला. परिणामी आज कारखाना बंद पडण्याची वेळ आली आहे. तालुक्याची जीवनवाहिनी बंद पडल्याने बाजारपेठ ओस पडली आहे. ऊसतोड मजूर, कामगार, वाहतूकदार आणि व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कारखाना वाचविण्यासाठी आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते जयसिंगराव (तात्या) शेंडगे यांनी केली. नांगोळे येथे महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

संदीप आबा गिड्डे पाटील यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. ते म्हणाले की, हा साखर कारखाना केवळ एक उद्योग नसून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. कारखाना बंद पडल्यामुळे तालुक्याच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सभासदांचा विश्वास संपादन करून कारखान्याला सक्षम नेतृत्व देण्याचा निर्धार आपण केला पाहिजे. यावेळी मिलिंद बापू कोरे, समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य विकास हक्के, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे, पंचायत समितीचे उपसभापती वामन कदम, मार्केट कमिटीचे माजी सभापती महेश पवार, नेताजी पाटील, काँग्रेस नेते प्रा. दादासाहेब ढेरे, अविराजे शिंदे, आप्पासाहेब कोळेकर, तुकाराम पाटील, दिलीप झुरे, आप्पासाहेब सगरे, संजय शेटे, रणजीत घाडगे, विक्रम कोळेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीला आमदार रोहित पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कृती समितीची ताकद वाढल्याची चर्चा तालुक्यात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here