अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत; कर्जमाफीच्या निकषांचा फेरविचार करण्याची शरद पवारांची मागणी

मुंबई : राज्यातील कर्जमाफी योजनेतील काही अटी आणि पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने या निकषांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी केली आहे. तसेच अलीकडील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे ऊस व केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी शेतकरी प्रश्न, पीक नुकसान आणि राज्यातील कृषी परिस्थितीवर भाष्य केले. कर्जमाफीचा निर्णय चुकीचा नसला तरी प्रत्यक्षात काही अटी आणि निकष अनेक पात्र शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकशाही व्यवस्थेत शासनाने जनतेशी सातत्याने संवाद साधणे गरजेचे असल्याचे सांगत पवार म्हणाले की, शेतकरी संघटना आणि लाभार्थ्यांकडून येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेऊन आवश्यक बदल करण्याची तयारी सरकारने दाखवली पाहिजे. केवळ घोषणा करून न थांबता त्या निर्णयांचा शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष किती परिणाम होतो, याचाही विचार करणे आवश्यक आहे. कर्जमाफीच्या निकषांबाबत विविध शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, या विषयावर मुख्यमंत्री तसेच केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील ऊस आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून तज्ज्ञांच्या पथकानेही परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणले आहे. या अहवालाचा सखोल अभ्यास करून पुढील भूमिका निश्चित करण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here