सोलापूर : दामाजी साखर कारखान्याकडून फेब्रुवारीतील गाळप झालेल्या उसाचे बिल जमा

सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामात दि. १ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन २,८५० रुपये दराने ऊस बिल अदा केले. ही रक्कम संबंधित बँका व पतसंस्थांकडे वर्ग केली आहे. शेतकऱ्यांनी ९ जूनपासून बिलाचे व्हाउचर घेऊन रक्कम स्वीकारावी, असे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.

कारखान्याची एफआरपी २,६८९.६५ रुपये असताना संचालक मंडळाने प्रतिटन १६०.३५ रुपये अधिक दर देत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. यावेळी व्हा. चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक रमेश जायभाय, खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here