पुणे : थोडेसे बदला, १०० टन उत्पन्न काढा; ‘श्रीनाथ म्हस्कोबा’च्या वतीने ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम

पुणे : दौंड तालुक्यातील टाकळी भीमा येथे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दीपक रोडे यांनी मार्गदर्शन केले. रोडे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पूर्वीसारखे आत्ता राहून चालणार नाही, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या खर्चाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

भौतिक गरजा वाढलेल्या आहेत. परंतु त्यानुसार उत्पन्न वाढलेले नाही. किंवा जमीन वाढलेली नाही तर जमिनीचे तुकडे झालेले आहेत. त्यामुळे उपलब्ध जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी कमी खर्चात उसाचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी कारखान्यातर्फे आम्ही सगळे परिसंवादाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यावेळी त्यांनी ऊस वाढीसाठी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे संचालक भगवान मेमाणे, माजी सरपंच वाल्मिक ठाकूर, बजरंग मुरकुटे, संतोष गरदरे, भरत वडघुले, हनुमंत वडघुले, निखिल ठाकर, तुषार वडघुले, प्रमोद नरसाळे, काशिनाथ गरदरे, दीपक वडघुले, प्रवीण मुरकुटे, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here