लातूर : विलास साखर कारखान्याकडून अंतिम २८१ रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

लातूर : उदगीर तालुक्यातील विलास सहकारी साखर कारखान्यामध्ये (युनिट क्रमांक २) गाळपास आलेल्या उसाला प्रती टन ३ हजार १३१.७२ प्रमाणे अंतिम ऊस दर निश्चीत झाला असून यापूर्वी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना २ हजार ८५० प्रती टन प्रमाणे ऊस बिल अदा केले. उर्वरित २८१ रुपये ७२ पैसे प्रती टन प्रमाणे अंतिम ऊस बिल सोमवारी (ता.१५) संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. कारखान्याने हंगामात ५ लाख ९४१.४०५ टन उसाचे गाळप करून ४ लाख ८६ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आसवनी विभागाकडील सिरफ डायव्हर्जनसह १२.२१३ टक्के साखर उतारा प्राप्त केला आहे. त्यासोबतच आसवनी प्रकल्पातून १ कोटी ३३ लाख ३५ हजार बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

याबाबत कार्यकारी संचालक आत्माराम पवार यांनी सांगितले की, मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख तसेच कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख, व्हाइस चेअरमन वैजनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम २०२५ २६ यशस्वी केला आहे. विलास सहकारी साखर कारखान्यामुळे जळकोट, उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर व चाकूर या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार झालेला आहे. दरम्यान, अंतिम ऊस बिल आता बँकेच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. जमा केलेली अंतिम ऊस दराची रक्कम घेण्यासाठी संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी बँक शाखेशी संपर्क साधावा.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here