महाराष्ट्र : साखर उद्योगाची आर्थिक संकटातून वाटचाल, केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील तसेच साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत २७ मे रोजी दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत कांदा आणि साखर उद्योगासमोरील विविध अडचणींबाबत सादरीकरण करण्यात आले होते. केंद्रातील अधिकाऱ्यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून १० दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. नंतर हा निर्णय १५ जूनपर्यंत होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे निर्णय नेमका कधी होणार, याकडे आर्थिक संकटातून वाटचाल करत असलेल्या साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

दिल्लीत झालेल्या बैठकीत साखरेच्या किमान विक्रीच्या दरात वाढ करणे, साखर उद्योगाच्या कर्जांचे पुर्नगठण व इथेनॉल दराचा मुद्दा मांडण्यात आला होता. तसेच ‘नाफेड’ मार्फत कांदा खरेदी सुरळीत करावी अशी मागणी करण्यात आली होती. यासह कांदा दरातील घसरण ही आयात-निर्यात धोरणात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे होत असल्याचेही बैठकीत मांडण्यात आले होते. स्थानिक बाजारपेठेचा विचार करूनच आयात-निर्यात धोरण निश्चित करावे, अशी मागणीही करण्यात आली होती. सध्या सहकार मंत्रालयाचा निर्णय तयार असला, तरी तो अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here