अहिल्यानगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख संस्थापक असलेल्या व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे मार्गदर्शन असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्यासाठी दाखल केलेल्या ७४ पैकी ४९ उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले. २१ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. विरोधी गटातील तीन व एका अपक्ष उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने सर्वांना मतदान प्रक्रियेसाठी सामोरे जावे लागणार आहे.
आमदार विठ्ठल लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या गटाकडून करजगाव गटात किरण लक्ष्मण जाधव व नारायण दत्तात्रेय डौले यांचा, तसेच महिला राखीवमध्ये मीराबाई भाऊसाहेब दिवटे हे तीनच अर्ज आहेत. इतर गटात फक्त गडाख गटाचेच उमेदवार आहेत. अपक्ष गोरक्षनाथ मोहन जाधव यांचा करजगाव गटात अर्ज राहिला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या गटातील अठरा उमेदवार आज बिनविरोध झाल्यात जमा आहे. अवघ्या तीन जागांसाठी शुक्रवारी (ता. २६) मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी अर्ज मागे घेतलेल्या ४९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.
गटानुसार शिल्लक राहिलेले उमेदवार असे,
सोनई गट : वसंत कुसळकर, छाया भुसारी, दिनकर घावटे, घोडेगाव गट लक्ष्मण पांढरे, एकनाथ जगताप, दत्तात्रेय बन्हाटे, खरवंडी गट: बापूसाहेब शेटे, भाऊसाहेब मोटे, सोपान विरकर, करजगाव गट डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, चंद्रकांत टेमक, नेवासे गट : बाळासाहेब भणगे, त्रिंबक सुकाळकर, प्रवरासंगम गट: बाळासाहेब पाटील, पांडुरंग निपुंगे. इतर उमेदवार शंकरराव गडाख (उत्पादक सहकारी), शंकर कदम (अनुसूचित जाती जमाती), कमल चांगदेव दहिफळे, विमल नारायण सोनवणे (महिला राखीव), भाऊसाहेब भालके (इतर मागासवर्गीय), बाळासाहेब परदेशी (विमुक्त जाती जमाती) यांचे अर्ज शिल्लक आहे.


















