सांगली : क्रांती साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन, यंदा करणार १३ लाख टन ऊस गाळप

सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणी, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामुग्रीची देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात गळीत हंगाम सुरू करण्यात येणार आहे. ट्रॅक्टर, ट्रक, अंगदगाड्या, बैलगाड्या तसेच हार्वेस्टर मशिन्ससह सर्व ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कारखाना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक तथा आमदार अरुण लाड यांनी केले. आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी हंगामात १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

आमदार लाड म्हणाले की, “शेतकऱ्यांनी दुष्काळाबाबत चिंता करू नये. यंदा चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. भरघोस ऊस उत्पादनासाठी कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडेच पाठवावा. अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांच्या अथक परिश्रमामुळे कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे. प्रत्येक गळीत हंगामात विविध पुरस्कार मिळत आहेत. यंदा सर्वोत्कृष्ट दर्जाची साखर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दरम्यान, यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष जयप्रकाश साळुंखे, संचालक मंडळाचे सदस्य, सभासद, शेतकरी तसेच कारखान्याच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here