कर्नाटक : मार्कंडेय कारखाना करणार नोव्हेंबरपासून ऊस गाळप, कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी करार

बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कारखान्यात गाळप प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. मात्र, यंदा पुन्हा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. १८) या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी करार करण्यात आला. संचालक अविनाश पोतदार आणि सीए घाळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना पुन्हा कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना दीर्घकाळ बंद असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः वीज बिल थकबाकीमुळे मागील वर्षभरापासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे सर्वप्रथम वीजपुरवठा पूर्ववत करण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई येथील एका गुंतवणूकदाराने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी गणेश मंदिर आणि नागदेवता मंदिर येथे उपाध्यक्ष बसवंत मायाण्णाचे यांच्या हस्ते पूजन करून कामांना प्रारंभ करण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक झियाउल्ला, संचालक अविनाश पोतदार, सतीश अनगोळकर, राजेश सानिकोप यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. कारखान्यातील यंत्रसामग्री दीर्घकाळ बंद असल्याने ती निकामी अवस्थेत आहे. तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने मशिनरी दुरुस्ती, नव्याने बसविणे, तसेच ऊस तोडणीसाठी टोळ्यांबरोबर करार करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे असे सांगण्यात आले. यावेळी सहकारी संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांच्यासह अनिल कुट्रे, मनोज पावशे, मनोहर हुक्केरीकर, तानाजी पाटील, आर. आय. पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here