अहिल्यानगर : गौरी शुगरची आगामी हंगामाची तयारी, कारखान्यात मिलरचे पूजन

अहिल्यानगर : हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील गौरी शुगर कारखान्यामध्ये आगामी गळीत हंगामाच्या तयारीसाठी मिलर पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील होते. यावेळी त्यांनी गळीत हंगाम २०२६-२७च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. मिल रोलर पूजनामुळे कारखान्याच्या गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून, आगामी हंगामात शेतकऱ्यांना उत्तम सेवा, वेळेवर ऊस गाळप आणि उद्योगाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कारखाना कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.

ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार शुगर ग्रुपने संस्थापक-अध्यक्ष बाबूराव शुगर बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि पुरवठादार यांच्यातील समन्वयाच्या बळावर अल्पावधीतच साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली. ओंकार शुगर ग्रुप हा आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत आला आहे. यावेळी बोत्रे-पाटील यांनी कारखान्यातील यांत्रिक दुरुस्ती, देखभाल व आवश्यक कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. आगामी हंगामात अधिक क्षमतेने व कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज राहील, असे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here