कोल्हापूर : सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आणि शेतकरी हितासाठी अविरतपणे झटणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार सोहळा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याने कारखान्याच्या विकासाच्या वाटचालीत एक महत्त्वपूर्ण अध्याय नोंदवला गेला आहे. यावेळी गृहमंत्री शहा यांनी आवाडे जवाहर कारखान्याचे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यात मोलाचे योगदान असल्याचे नमूद करीत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणारी ही संस्था आदर्शवत असल्याचे गौरवोद्वार काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार चळवळीला दिशा देणाऱ्या नेतृत्वामुळेच अशा संस्था टिकून राहतात. बदलत्या काळात तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि शेतकरी हित याचा समतोल साधत आवाडे जवाहर कारखाना प्रगतीची नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, संजय सावकारे, जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राहुल आवाडे, शिवाजी पाटील, माजी आ. प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, जि.प. सदस्या सानिका आवाडे-यड्रावकर, सहकार भारतीच्या अध्यक्षा वैशाली आवाडे, रवी आवाडे, सपना आवाडे, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, आवाडे जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.


















