कोल्हापूर : ओंकार शुगर अॅण्ड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि, फराळे युनिट नं. ३ (ता. राधानगरी) या कारखान्याने करार केलेल्या स्थानिक व बीड तोडणी-वाहतुकदार यांचे खातेवर हंगाम 2026-27 अॅडव्हान्सचा पहिला हप्ता 60% प्रमाणे संबंधीत वाहतुकदार यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. बीड व तत्सम भागातील तोडणी-वाहतुक यंत्रणेची मजुर तपासणी पुर्ण होताच दुसरा हफ्ता लवकरात देण्यात येईल. येत्या हंगामासाठी लागणारी तोडणी-वाहतुक यंत्रणा ही सक्षम करारबद्ध झाली असुन हंगाम यशस्वी होवून उच्चांकी गाळप होईल, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
मागील हंगाम 2025-26 मधील ऊस बिले, तोडणी-वाहतुकीची 2026-27 ची स्थानिक व बीड तोडणी-वाहतुक यंत्रणेची अॅडव्हान्स पहिला हफ्ता वेळेवर दिल्यामुळे तोडणी मजुर वाहतुकदार व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर-शत्रुघ्न पाटील, प्रभारी मुख्य शेती अधिकारी साताप्पा खाडे, चिफ अकौंट शरद पाटील, चिफ इंजिनियर नानासो जाधव, चिफ केमिस्ट- डी.एस. पाटील, केनयार्ड सुपर वायझर संभाजीराव देसाई, असिस्टंट लेबर ऑफिसर- प्रशांत कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.


















