कर्नाटक : ‘सतीश शुगर्स’कडून शाश्वत शेती अभियानाला चालना; मृदा परीक्षण, ऊस संशोधन केंद्राचे उद्घाटन

बेळगाव : रासायनिक खतांचा अतिरेक, मातीच्या गुणधर्मांविषयी माहितीचा अभाव आणि अवैज्ञानिक शेती पद्धतींमुळे जमिनीतील पोषक घटकांची संख्या कमी होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून ‘सतीश शुगर्स’चे संस्थापक अध्यक्ष तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू झाले आहे. केंद्रामध्ये मातीचे नमुने तपासून त्यातील पोषक घटक, पीएच मूल्य आणि इतर गुणधर्मांचे विश्लेषण होईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ यातून होईल असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तथा सीएफओ प्रदीपकुमार इंडी यांनी केले. हुन्शाळ पी. जी. येथील सतीश शुगर्स लिमिटेडमध्ये अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊस संशोधन व मृदा परीक्षण केंद्राचे उद्घाटन इंडी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

इंडी म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि पिकांसाठी आवश्यक शिफारशी देण्यात येतील. काही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मृदा परीक्षण करून जैविक खतांचा वापर करण्यात आला होता. त्यातून प्रतिएकर १४ ते १५ टनांपर्यंत अतिरिक्त ऊस उत्पादन मिळाल्याचे समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत. एच. डी. कोळेकर म्हणाले की, जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मृदा परीक्षण केंद्राची स्थापना ही दूरदृष्टीपूर्ण बाब आहे. यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, उपसंचालक डॉ. सहदेव यरगोप्प, चिकोडी विभागाचे उपसंचालक सलीम संगतराश, गोकाकचे सहायक कृषी संचालक एम. एम. नदाफ, प्रगतिशील शेतकरी अज्जप्पा गिरड्डी, बी.एच. रेड्डी व कल्लिनाथ पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. वरिष्ठ उपाध्यक्ष पी. डी. हिरेमठ, उपाध्यक्ष व्ही. एम. तळवार, डी. आर. पवार, मद्यनिर्मिती विभागाचे महाव्यवस्थापक महेश जी. आर., ऊस विभागाचे महाव्यवस्थापक एम. बी. ससाळट्टी, बेळगाव शुगर्स प्रा. लि.चे ऊस विभागप्रमुख एस. आर. बिरजे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here