सातारा : श्री दत्त इंडिया कारखान्याकडून प्रतिटन २०० रुपये ऊस बिल अदा, शेतकऱ्यांना मिळाले १५ कोटी रुपये

सातारा : साखरवाडी (ता. फलटण) येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या साखर कारखाना व्यवस्थापनाने २२ ऑक्टोबरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात दसऱ्यानंतर उर्वरित ऊस बिल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्यावर्षीच्या, सन २०२५-२६ मधील गळीत हंगामातील उसाच्या उर्वरित बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ७९ लाख ६७ हजार ५८९ रुपये अदा करण्यात आले आहेत. कारखान्याचे मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांनी ही माहिती दिली. जवळपास ११ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात उसाच्या लागवडीचे योग्य नियोजन, एकरी ऊस उत्पादन व टनेज वाढविण्याचे प्रभावी तंत्र व कारखान्याचे लागवड धोरण या विषयांवर चर्चा करण्यात आली होती. त्याावेळी प्रलंबित असलेल्या ऊस बिलाबाबतही चर्चा झाली. ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळावी, या उद्देशाने आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणे, हेच कारखान्याचे ध्येय्य असल्याने तातडीने ऊस बिले अदा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कारखान्याचे फायनान्स सर व्यवस्थापक अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागणवर, दिगंबर माने, युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, संतोष भोसले, सुहास गायकवाड, पोपटराव भोसले आणि ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here