पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये सहभागी असलेल्या २१० साखर कारखान्यांपैकी १५४ कारखान्यांकडून एफआरपीची शंभर टक्के रक्कम देण्यात आली आहे. तर १५ जूनअखेरच्या अहवालानुसार, ५६ कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ३९६ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी ९९.०२ टक्के एफआरपी दिली आहे.
राज्यात एप्रिलअखेर १० कोटी ४५ लाख ६३ हजार टनांइतके ऊस गाळप झाले. ऊसतोडणी व वाहतूक खर्चासह शेतकऱ्यांना देय एफआरपीची रक्कम ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४० हजार ५० कोटी रुपये जमा केले. ही रक्कम ९९.०२ टक्के आहे. सद्यःस्थितीत ५६ कारखान्यांकडे ३९६ कोटी रुपये थकीत राहिले आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी आयुक्तालयाचा पाठपुरावा सुरू आहे.


















