अहिल्यानगर : ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्यातर्फे २२ कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग

अहिल्यानगर : येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीची सुमारे २२ कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. जाहीर केलेल्या अंतिम दरानुसार उर्वरित रक्कमही पुढील आठ दिवसांत अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे सर्वेसर्वा अॅड. प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, गत गळीत हंगामातील शेवटच्या महिन्यातील ऊसबिलाची रक्कम देणे बाकी होती. ती एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जाहीर केलेल्या भावाप्रमाणे उर्वरित रक्कम देखील पुढील आठ दिवसांत अदा केली जाईल. सहकारी साखर उद्योगासमोरील अडचणींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, केदारेश्वर कारखान्याला कोणत्याही बँकेकडून अर्थसाहाय्य मिळत नाही. राज्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले कि, साखरेचा उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत आहे. एका क्विंटल साखर उत्पादनासाठी सुमारे चार हजार रुपये खर्च येतो, तर बाजारभाव केवळ ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे साखर उद्योग तोट्यात चालला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे ग्रामीण अर्थकारण सहकारी साखर कारखानदारीवर अवलंबून आहे. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या चर्चेनंतर सहकारी साखर उद्योगाला लवकरच दिलासा मिळेल आणि उद्योगासाठी चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here