कर्नाटक : ईको केन शगर एनर्जीच्यावतीने ‘ऊस संवाद’ मेळावा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बेळगाव : बदलत्या हवामानात ऊसाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. योग्य बेणेप्रक्रिया, संतुलित खत व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. यासाठी ईको केन एनर्जी लिमिटेडतर्फे शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक श्याम श्रीवास्तव यांनी दिली. ‘इको केन शुगर एनर्जी लिमिटेड’च्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बेळवट्टी व बिजगर्णी येथे ‘ऊस संवाद’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात बदलत्या हवामानातील शेतीची आव्हाने लक्षात घेऊन शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्य विविध समस्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उसावरील किडी व रोगांचे नियंत्रण, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन, दर्जेदार ऊस बेण्याची उपलब्धता आदी विषयांवरील प्रश्न उपस्थित केले. त्यावर उस विकास अधिकारी किशोर पाटील, शेती अधिकारी भूषण देसाई आणि शशिकांत थोरवत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कारखान्याचे मानव संसाधन व्यवस्थापक सचिन पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याचे चीफ केमिस्ट विजय पाटील यांनी उसातील साखरेचा उतारा वाढविण्यासाठी योग्य परिपक्वतेनंतर कापणी करणे आणि वेळेत कारखान्याकडे ऊस पुरवठा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला रसायनतज्ज्ञ विजय पाटील, व्यवस्थापक बाबासाहेब देसाई, बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष वसंत आष्टेकर, बेळवटी ग्रामपंचायत अध्यक्ष बाबुराव पाटील, गोपाळ बेळगावकर, बबन मोरे, गोपाळ पाटील, नामदेव पाटील, कारखान्याचे शेती मदतनीस बाळासाहेब पाटील, सुधीर कांबळे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here