ऊस शेतीतून भरघोस आणि हमखास उत्पादन घेण्यासाठी ऊससंख्या नियोजन महत्त्वाचे : ‘व्हीएसआय’चे शास्त्रज्ञ सुरेश माने

पुणे : कुटुंबव्यवस्थेत सुखी कुटुंबासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे ऊस शेतीतून उसाचे भरघोस आणि हमखास उत्पादन घेण्यासाठी ऊससंख्या नियोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले. ते देऊळगाव राजे येथील भैरवनाथ मंदिरात नेचर केअर फर्टिलायझर, दौंड शुगर कारखाना व कृषी विभाग दौंड यांच्यामार्फत आयोजित ऊस पीक परिसंवाद या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ऊस शेतीतील महत्त्वाचा विषय म्हणजे संख्या नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक पद्धतीत एकरी उसाची संख्या जवळपास एक ते दीड लाख असते आणि कारखान्याला प्रत्यक्षात तुटणाऱ्या उसाची संख्या फक्त ४० हजार असते म्हणजे खाऊन मारणाऱ्या उसाची संख्या जास्त असते. त्यामुळे पंचावन्न ते साठ हजार एकरी ऊस बांधणीच्या वेळी कसे राहतील याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास, उसाचे एकरी उत्पन्न हमखास वाढू शकते, असे माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी शाश्वत १०० टन ऊस घेण्यासाठी सखोल उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी विविध उपाययोजना, उसाच्या जातींची निवड, बेणे प्रक्रिया, शेतीची मशागत, ऊस लागवडीतील योग्य अंतर, खताचे डोस, स्वतःचा बेणे मळा, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आदी बाबत मार्गदर्शन केले.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी परिसरातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी चंद्रकांत वाबळे यांच्या शेतावर शिवार फेरीचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी माने यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर देखील शेतकऱ्यांना उसाचे योग्य संख्या नियोजन कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. यावेळी दौंड शुगर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, ज्ञानेश्वर काळे, प्रकाश खळदकर, देवराम कामठे, लालासाहेब गिरमकर, महेंद्र सातव, नारायण गिरमकर, दादा गिरमकर, पोपट देसाई आणि नेचर केअर कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, कृषी सहाय्यक शिवाजी कदम शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि आभार संदेश बेनके यांनी मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here