कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगातील प्रश्नांवर माणिक पाटील-चुयेकर यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, या प्रश्नांवर चालू अधिवेशनात चर्चा होईल, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला. आमदार नरके यांच्या हस्ते चुयेकर यांनी सरबत प्राशन करुन या अन्नत्याग आंदोलनाची सांगता केली. गेल्या आठदिवसापासून चुयेकर यांचे आंदोलन सुरू होते.
याप्रसंगी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, पी. के. पाटील, टी. के. किल्लेदार, आधिराज पाटील-चुयेकर, बाळासाहेब पाटील, रवींद्र मोरे, आनंदा कारंडे उपस्थित होते. दिवसभरात आंदोलनस्थळी राहुल पाटील-सडोलीकर, अरुण डोंगळे, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, संचालक शिवाजी कारंडे, बी. के. डोंगळे आदी नेत्यांनी भेट देत पाठिंबा दिला होता. तसेच अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली होती.


















