अहिल्यानगर : लोकनेते घुले-पाटील ज्ञानेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र घुले-पाटील बिनविरोध

अहिल्यानगर : येथील लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले-पाटील तर उपाध्यक्षपदी सुधाकर उर्फ काकासाहेब नारायणराव नरवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारखान्याच्या निवडणुकीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा ३० जून रोजी कारखाना अतिथीगृहात झाली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी नरेंद्र घुले-पाटील व उपाध्यक्ष पदासाठी सुधाकर नरवडे पाटील यांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांची निवडणूक दि. १८ जून रोजी बिनविरोध झाली होती. अध्यक्षपदी निवडीनंतर घुले-पाटील म्हणाले की, शेतकरी, कामगार कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेबांची परंपरा आहे ती यापुढे ही सुरूच राहील. कारखान्याचे माध्यमातून रचनात्मक कामे होतच राहतील. सर्वांना बरोबर घेऊन काम करू. माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, सभासद यांचे याकामी सहकार्य लाभले. निवडीनंतर संचालक मंडळाने लोकनेते मारुतराव घुले पाटील स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने अध्यक्ष- उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. संचालक पंडितराव भोसले यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, संचालक पंडितराव भोसले, डॉ. नारायण म्हस्के, जनार्दन कदम, अशोकराव मिसाळ, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अॅड. हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, सुमनबाई काळे, रंजना तानवडे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here