साखरेचा एमएसपी वाढविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा; इथेनॉल दर व कोटा वाढविण्याचीही मागणी : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : राज्यातील साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढविणे, तसेच इथेनॉलचा दर आणि कोटा वाढविण्याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली.राज्यात २०० हून अधिक सहकारी आणि खासगी साखर कारखाने कार्यरत असून, २०२५-२६ च्या गाळप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र, केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.

यासंदर्भात आमदार सदाशिव खोत, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, डॉ. परिणय फुके आणि उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर लेखी उत्तर देताना सहकारमंत्री पाटील यांनी साखर निर्यात धोरण हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचे स्पष्ट केले.केंद्र सरकारने १३ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी कायम राहिल्यास राज्यातील साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधित अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ChiniMandi WhatsApp Channel

सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २४ मार्च २०२६ रोजी राज्यातील साखर उद्योगाच्या विविध समस्यांवर बैठक झाली होती. या बैठकीत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मागण्यांबाबत राज्याच्या शिष्टमंडळाने केंद्राशी थेट चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार २७ मे २०२६ रोजी नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसमोरील विविध अडचणी आणि मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत केंद्रीय सहकारमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here