सातारा : कराड तालुक्यातील काही गावातील ऊस पिकामध्ये वानरांचा उच्छाद, शेतकरी हैराण

सातारा : कराड तालुक्यातील उंडाळे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असून, यावर्षी पाऊस लांबल्याने शिवारात वानरांना खाण्यासाठी काही नसल्याने वानरांनी आपल्या खाण्यासाठी उभ्या उसाकडे मोर्चा वळवला आहे. उभ्या उसाच्या कांड्या मोडून ऊस खात आहेत व पिकाचे नुकसान करत आहेत. यात ऊस पिकाचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाने तत्काळ वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वानरांचा उपद्रव इतका वाढला आहे की, शेतात रखवालीसाठी जाणेही कठीण झाले आहे. वानरांच्या टोळ्या माणसांचे अंगावर धावून येत असल्याने शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उंडाळेसह परिसरात भुकेने व्याकुळ झालेल्या वानरांच्या टोळ्यांनी ऊस पिकावर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. उभा ऊस मोडून अर्धवट खात जातो. आधीच यावर्षी पाऊस लांबल्याने पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यातच सध्या वानरानी ऊस पिकात धुडगुस घालण्यास सुरुवात केल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वानरांच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वन विभागाने या वानरांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी तेजदिप शेतकरी, कृषी व कृषी पदवीधर विकास संस्था, संस्थापक अध्यक्ष, श्रीविनायक यादव-पाटील-उंडाळकर यांनी केली आहे. वानरांकडून ऊस उपटून खाणे, कोवळे कोंब नष्ट करणे आणि उसाची कांड्यांची नासाडी करणे असे प्रकार सुरू आहेत. आधीच शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे संकटात आहेत. आता वानरांचे नवे संकट सोसावे लाागत आहे. वन विभागाने वानरांना पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी त्यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here