पुणे: कैलास गावडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सणसर (ता. इंदापूर) येथील शिवाजी रामराव निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेवरून कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत संचालक मंडळाशी चर्चा करून शिवाजी निंबाळकर यांचे नाव निश्चित केले. निवडणूक अधिकारी म्हणून बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी काम पाहिले. अध्यक्ष जाचक, कैलास गावडे, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांतनिवड दराडे आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, कारखान्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व घडामोडींमध्ये शिवाजी निंबाळकर यांनी साथ दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कारखान्याला सहकार्य मिळत आहे. उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर म्हणाले, अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. यावेळी अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, सुचिता सपकळ, माधुरी राजपुरे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, अजित थोरात आदी उपस्थित होते. युवराज रणवरे, सतीश गावडे आणि कामगारांनी निवडीनंतर शिवाजी निंबाळकर यांचा सत्कार केला.


















