पुणे : ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राज्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्र. १ ते २० चे अधिकारी, कर्मचारी तसेची शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्र. ८ पांगरी, येथे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शनिवारी (दि.११) सकाळी सहा वाजता वैद्यनाथ मंदिर येथे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व कारखाना स्थळावरील हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दुग्ध अभिषेक करून तसेच कौठळी तांडा जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे शालेय साहित्य व खाऊवाटप, तर गुरुदास वृद्धाश्रम घाटनांदुर येथे
अन्नदान, कर्मचारी यांना अल्पउपहार देवून कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून मा. चेअरमन बोत्रे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गळीत हंगाम २०२६-२७ साठीचे मील रोलर पूजन लालाजी महाराज दहिवाळ, गुरुदास वृद्धाश्रम, घाटनांदुर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी गुरुदास वृद्धाश्रम घाटनांदुर येथील गुरु माय सीताबाई तुळशीराम दहिवाळ, राजेशजी गीते, ज्ञानोबा मुंडे पोलीस पाटील पांगरी, विष्णू तांबडे, बाळासाहेब चव्हाण, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुधाकर व्ही सोळंके, विजय डंबाळे आणि कारखान्याचे विविध खाते प्रमुख, उपखाते प्रमुख व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओंकार साखर कारखाना तडवळ युनिट ५, रुद्देवाडी युनिट १५ व धोत्री युनिट २१ येथे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही.एम. गायकवाड त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा वृक्षारोपण उपक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता हरित परिसर – स्वच्छ पर्यावरण या संकल्पनेला बळ देणारा ठरला.
‘गौरी शुगर’च्या वतीने रक्तदान, वृक्षारोपण
गौरी शुगर साखर कारखाना अण्ड डिस्टिलरीज प्रा. लि., हिरडगाव (युनिट क्र. ०४) यांच्या वतीने विविध सामाजिक व लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कारखाना परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ओम ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी सहभाग घेतला. यावेळी कारखान्याच्या संचालक डॉ. गौरी बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांडगाव, घोडेगाव आणि हिरडगाव येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. तसेच महामानव बाबा आमटे विद्यार्थी सहायक समिती, स्नेहालय परिवार आणि घुगल वडगाव येथील आदिवासी वस्तीगृहास साखरवाटप करण्यात आली.
यावेळी ओंकार ग्रुपच्या संचालिका डॉ. गौरी बोत्रे-पाटील म्हणाल्या, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात सातत्याने कार्य करणे हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद प्रेरणा देणारा ठरला. भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा कायम ठेवली जाईल.यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव, हिरडगावच्या सरपंच विद्या बनकर, उपसरपंच अमोल दरेकर, सदस्य गंगाराम दरेकर, चिमाजी दरेकर, रवींद्र म्हस्के, रामदास घोडके, नंदा माळी, शालेय समितीचे अध्यक्ष दीपक मचे, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शेतकरी तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















