छत्रपती संभाजीनगर : मुक्तेश्वर शुगर मिलमध्ये रोलर पूजन, गळीत हंगामाची तयारी सुरू

छत्रपती संभाजीनगर : मुक्तेश्वर शुगर मिलच्यावतीने आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी कारखान्यातील यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल व जोडणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून कामे पूर्ण करावीत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम यांनी केले. गंगापूर तालुक्यातील या कारखान्याने आगामी गळीत हंगाम २०२६-२७ची पूर्वतयारी वेगाने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून कारखान्यात मिल रोलरचे पूजन ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जंगम बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ यांनी, मुक्तेश्वर शुगर मिल हा नेहमीच ऊस उत्पादक व कामगारांच्या हिताला प्राधान्य देणारा कारखाना असल्याचे सांगत व्यवस्थापनाच्या विश्वासार्हतेबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम, मुख्य अभियंता दिगंबर आडकिने, मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर, अभियंता प्रमोद काळे व मुख्य रसायनतज्ज्ञ पंडित गोर्डे, हिशेबनीस रामेश्वर म्हस्के, ऋषीकेश मोरे, श्रीकांत गोरे, युकीत पाटणी, सखाराम मोरे, आनंद भोसले, विनोद मोरे, किरण सरोदे, माधव जाधव, दीपक शेवाळे, विठ्ठल टेके यांच्यासह अधिकारी, कामगार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here