अहिल्यानगर : वृद्धेश्वर कारखान्याचे माजी आमदार आप्पासाहेब राजळे अध्यक्ष, पदाधिकारी निवडी बिनविरोध

अहिल्यानगर : नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानापूर्वीच १९ पैकी १७ जागा आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही राजळे गटाने विजय मिळवून सर्व १९ संचालक जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव नाईक यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या सभागृहात नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांची तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब किलबिले यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शनिवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी माजी आमदार राजळे आणि उपाध्यक्षपदासाठी किलबिले यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी आप्पासाहेब राजळे यांनी अध्यक्ष, तर रामकिसन काकडे यांनी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. यावेळी आमदार तथा कारखान्याच्या संचालिका मोनिका राजळे, ज्येष्ठ संचालक उद्धव वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संचालक राहुल राजळे, सुभाष ताठे, अनिल फलके, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, यशवंतराव गवळी, सुरेश आठरे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, काकासाहेब शिंदे, सिंधूबाई जायभाय, बापूसाहेब पाटेकर, संदीप लोखंडे हे संचालक उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here